SSC-HSC Exam Time Table : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर

पुणे : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक (Time Table) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार (Time Table) बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक (Time Table) आज संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची … Read more

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर

औरंगाबाद – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर ऑफलाईन पद्धतीने दिला. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याने शैक्षणिक प्रवाह पुन्हा सुरु झाल्याचा चित्र दिसून आले. शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालये, शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्रे अशा 440 परीक्षा केंद्रांवर आज परीक्षा पार … Read more

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर

HSC studant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडलाच्यावतीने हा बदल करण्यात आला आहे. 5 आणि 7 मार्चच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा पेपर आता 5 एप्रिल रोजी होणार आहेत. … Read more

दहावी बारावी परीक्षेच्या भरारी पथकात राहणार आरोग्य विभागाचे पथक

Exam

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा केंद्राना भेटी देवून पहाणीसाठी शासनाच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती (भरारी पथक) स्थापन केली जाते. यामद्ये पोलिस आयुक्तालय, जिल्हा परीषद, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असतो. यंदा कोरोनाच्या अनुषंगाने या भरारी पथकात आरोग्य विभागाचा देखील समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावी … Read more

दहावी-बारावीची परीक्षा महिन्यावर परंतु लसीकरण मात्र काठावर!

औरंगाबाद – दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश शिक्षण मंडळाने जानेवारी महिन्यात दिले होते. परंतू, महिनाभरात केवळ 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अद्याप 70 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी म्हणजे एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. शिक्षण मंडळातर्फे … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला

Exam

औरंगाबाद – कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा चालू-बंदचा खेळ सुरु आहे. या काळात तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय मंडळाचे सचिव यांना निवेदन देण्यात … Read more

दहावी बारावीचे परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

Exam

औरंगाबाद – औरंगाबाद विभागीय मंडळातील जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी 408 मुख्य केंद्रे निश्चिती झाली होती. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी एक हजार 822; तर बारावीसाठी 855 या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात येत आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा … Read more

दहावी, बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागात 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दहावीसाठी आतापर्यंत 1 लाख 77 हजार 135 तर बारावीसाठी 1 लाख 61 हजार 942 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव आर. … Read more

पुरवणी परीक्षा: औरंगाबाद विभागात दहावी-बारावीचे ‘इतके’ विद्यार्थी उत्तीर्ण

औरंगाबाद – दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना निकालांवर आक्षेप होता त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून फेर परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद विभागातून दहावीत 31.64 टक्के तर बारावीत 36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 607 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून मात्र 180 … Read more

बारावीच्या गुणपत्रिकेचे 20 ऑगस्टपासून  होणार वाटप

SSC student

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा गुणपत्रिका 20 ऑगस्टपासून वितरित केल्या जाणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका यांचे वितरण करावे अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानूसार सदर निकालाची गुणपत्रक व … Read more