BOB FD Rate | भविष्याच्या दृष्टिकोनातून लोक आपल्या मुलांसाठी त्याचप्रमाणे आपले निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखात जावे. यासाठी आजच काही ना काही बचत करत असतात. मार्केटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतानाही अनेक लोक आजही बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण बँकांची FD ही त्यांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली परतावा देणारी योजना वाटते. त्यामुळे अनेक बँका देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या एफडीचे पर्याय देत असतात.
अशातच आता देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँकांपैकी बँक ऑफ बडोदाने (BOB FD Rate) त्यांच्या एफडीच्या दरांमध्ये बदल केलेला आहे. या बँकेने त्यांच्या 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहे . त्यांनी हे नवीन दर 13 ऑगस्टपासून लागू केलेले आहेत. आता ही बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षाच्या एफडीवर नवनवीन ऑफर देत आहे. आता हे व्याजदर नक्की कसे आहेत? हे आपण जाणून घेऊया.
BOB च्या FD वर व्याजदर | BOB FD Rate
- 7 दिवस ते 14 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के
15 दिवस ते 45 दिवस – सामान्य लोकांसाठी: 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 5 टक्के - 46 दिवस ते 90 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6 टक्के
- 91 दिवस ते 180 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.10 टक्के
- 181 दिवस ते 210 दिवस – सामान्य लोकांसाठी: 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.25 टक्के
- 211 दिवस ते 270 दिवस – सामान्य लोकांसाठी: 6.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.65 टक्के
- 271 दिवस आणि त्याहून अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी – सामान्य लोकांसाठी: 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के
- ३३३ दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी : ७.१५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
- 360 दिवस – सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के
- 1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
- 399 दिवस मान्सूनचा धमाका – सर्वसामान्यांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के
- 1 वर्षापासून 400 दिवसांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
- 400 दिवस ते 2 वर्षे – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के
- 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के
- 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.15 टक्के
- 5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के