धक्कादायक! बाॅडी बिल्डर तरुणाने वडिलांचा खून करुन कापले लिंग…अन् नंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | देशात मागील एक महिण्यापासून लाॅकडाउन आहे. यामुळे घरात राहून अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नागपूरात एका बाॅडीबिल्डर मुलाने नैराश्यात येऊन आपल्या वडिलांचा खून केल्याचे समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता सदर तरुणाने वडिलांचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, विजय पिल्लेवान (वय 56 वर्षे) असे मृत वडिलांचे नाव आहे. ते व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते. नागपूरातील नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनीत ते कुटुंबासह राहत होते. त्यांना विक्रांत नावाचा मुलगा आणि सोनू नावाची धाकटी मुलगी आहे. 28 वर्षीय विक्रांतला बॉडी बिल्डिंगचे वेड लागले होते. परफेक्‍ट बॉडीसाठी त्याने काही पावडर आणि स्टेरॉइडसचे इंजेक्‍शन घेणे सुरू केले होते. मात्र, कोरोना विषाणूचा देशात शिरकाव झाल्याने जवळपास मागील दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे जिम बंदच आहे. लॉकडाउनमुळे जिम बंद असल्याने त्याने पावडर खाणे आणि इंजेक्‍शन घेणे बंद केले होते. त्यामुळे तो नैराश्‍यात गेला होता.

चार दिवसांपासून तो फार तणावात होता. काल रात्री 11 वाजताच्या सुमारास विक्रांत अचानक किंचाळायला लागला. अकस्मात हिंसक झालेल्या विक्रांतने भिंतीला लाथा बुक्‍क्‍या मारणे सुरू केले होते. वडिलांनी त्याला समजवण्याचा व आवरण्याचा प्रयत्न केला; परंतु विक्रांतने अचानक जन्मदात्या बापावरच हल्ला केला. यानंतर त्याने वडिलांवर चाकूने हल्ला केला व गळा कापला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर वडिलांचे लिंग चक्क दातांनी तोडून बाजूला फेकले.

यानंतर विक्रांतच्या एका मित्राने हुडकेश्‍वर पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी दुचाकीने घटनास्थळी आले. मात्र, विक्रांतचे रूप पाहून त्यांनी लगेच पोलिस ठाण्याकडे धाव घेतली आणि अर्ध्या तासानंतर 10 पोलिस कर्मचारी घेऊन परत घटनास्थळावर आले. त्यानंतर पोलिसांनी काही युवकांच्या मदतीने विक्रांतला पकडले आणि दोरीने बांधून पोलिसांच्या गाडीत कोंबले.

दरम्यान, जखमी विजय पिल्लेवान यांना पोलिसांनी उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी विक्रांत पिल्लेवान याच्यावर हत्याकांडाचा गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार