Boeing 787 Dreamliner Details : कोसळलेल्या विमानाबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हांला माहीतेयत का? जाणून घ्याच

Boeing 787 Dreamliner Details
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हलो महाराष्ट्र ऑनलाईन Boeing 787 Dreamliner Details । गुजरातमध्ये आज धक्कादायक विमान अपघात घडला. लंडनला जाणारे Air India Boeing 787-8 Dreamliner,विमान अहमदाबाद येथील मेघानीनगर येथे कोसळलं. या विमानाने सरदार वल्लभभाई पटेल विमानतळातून टेक ऑफ केलं होतं, मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या १५ मिनिटात ते कोसळलं. या संपूर्ण घटनेने देशात खळबळ उडाली आहे. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी आगडोंब बघायला मिळाला. विमानात तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत होते.. त्यामुळे इतकं मजबूत विमान कस काय कोसळलं याची चौकशी आता सुरु आहे. आज आपण Air India Boeing 787-8 Dreamliner या विमानाबद्दल अशा गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुम्हाला माहिती नसतील.

१३,५३० KM अंतर पार करण्याची क्षमता – Boeing 787 Dreamliner Details

तर बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर (Boeing 787 Dreamliner Details) हे एक अत्याधुनिक विमान आहे. या विमानाची बॉडी रुंद असून खास करून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ते डिझायन करण्यात आलं आहे. सामान्यतः २४२ ते २९० प्रवाशांना बसण्याची सोय या विमानामध्ये असते, जी एअरलाइन कॉन्फिगरेशनवर अवलंबून असते. हे विमान १३,५३० किलोमीटर अंतर अगदी नॉन-स्टॉप पद्धतीने करू शकते. म्हणजेच काय तर कितीही लांबचा प्रवास असला तरी बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर मधून होऊ शकतो. विमानाची लांबी ५६.७० मीटर, पंखाची रुंदी ६० मीटर, उंची १६.९० मीटर आहे. या विमानात एका वेळी १,२६,२०६ लिटर पेट्रोल भरण्याची क्षमता आहे. प्रतितास ९५४ किमी अंतर पार करण्याची क्षमता या विमानात आहे. नवीनतम एव्हियोनिक्स, फ्लाय-बाय-वायर नियंत्रणे आणि प्रगत सुरक्षा प्रणालींनी हे विमान सुसज्ज आहे. बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर (Boeing 787 Dreamliner Details) या विमानाची किंमत अंदाजे २१.८ अब्ज इतकी आहे.

दरम्यान, एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने Mayday!! Mayday!! Mayday असा संदेश जवळच्या एटीसीला दिला होता. मात्र तोपर्यंतच हे कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. सुमित सभरवालला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्हला 1100 उड्डाण तासांचा अनुभव होता. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हे विमान थेट एका इमारतीवर आदळलं (Air India Plane Crash) . संपूर्ण देशासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे.