72 जणींचा बाॅयफ्रेंड अन् 9 जणींचा नवरा; बोगस डाॅक्टरचे कारनामे एकुन हादरुन जाल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसई : एका बोगस डाॅक्टरने खोटं बोलून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण डाॅक्टर असल्याचं सांगून वसई येथील एकाने तब्बल 72 जणींना प्रेमात खेचलंय तर 9 जणींसोबत विवाह केला असल्याचं बोललं जात आहे. तसेच या बोगस डाॅक्टरने अनेक चुकिच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करुन कित्तेकांना कायमचंच बेडवर बसवलं आहे.

अस्थीरोग तज्ज्ञ म्हणजेच ऑर्थोपेडिक असल्याचं भासवून खोट्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 51 वर्षीय भामट्याला वसई पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपी हेमंत पाटील उर्फ ​​हेमंत सोनवणे आणि वसई-विरारचे माजी नागरी वैद्यकीय प्रमुख सुनील वाडकर यांनी एकत्र मिळून अनेक बनावट शस्त्रक्रिया केल्याचा आरोप होत आहे. वाडकरांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे हेमंत सोनवणे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मसाले विकायचा. ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे खोटे सांगणाऱ्या हेमंत सोनवणेने अनेक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले होते. त्याने आपण अनाथ असल्याचाही दावा केला होता. ​​

काय आहे प्रकरण?

हेमंत सोनवणे याने सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांना टार्गेट केले होते. मिड-डे वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. “हेमंत सोनवणेला पॉर्नचे व्यसन आहे. त्याला मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे” असं सोनवणेच्या निकटवर्तीयांनी सांगितल्याचं मिड-डेच्या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे. सोनवणे त्याच्या पहिल्या पत्नीला कटनी येथे भेटला होता. त्यांना 18 वर्षांचा एक मुलगाही आहे. या जोडप्याच्या घटस्फोटानंतर तो त्याच्या आईसोबत राहतो. सोनवणेची पहिली पत्नी सरकारी कार्यालयात इंजिनियर म्हणून कार्यरत होती.

सोनवणेचे त्याच्या हॉस्पिटलमधील परिचारिकांसह जवळपास 72 हून अधिक महिलांशी अनैतिक संबंध होते, तर काही जणींसोबत तो लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहत होता. काही जणींशी त्याने लग्नही केले, असा आरोप केला जात आहे. सोनवणेच्या मोबाईलमधील काँटॅक्ट्सपैकी 90 टक्क्यांहून अधिक क्रमांक महिलांचे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

कोण आहे हेमंत सोनवणे?

हेमंत सोनवणे हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे. त्याचे वडील मुरलीधर सोनवणे रेल्वे मेल सेवेत (RMS) काम करत होते, त्यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. तर त्याची आई मालती गृहिणी होती. त्या मार्च 2018 मध्ये कालवश झाल्या. त्याची मोठी बहीण मंदा चौहान या प्राथमिक शाळेत शिक्षिका असून चाळीसगाव येथे राहतात. त्याचा धाकटा भाऊ हितेंद्र सोनवणे याने अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली असून तो डोंबिवलीत राहतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तो नेहमी म्हणायचा की तो अनाथ आहे आणि त्याला सांभाळायला कोणी नाही. पण खरं तर, जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याचे आई-वडील जिवंत होते, असं एका पीडित महिलेने सांगितलं.

डेंटिस्ट महिलेशी विवाह

2014 मध्ये सोनवणेशी लग्न करणाऱ्या एका डेंटिस्ट महिलेने सांगितलं की “त्याच्याशी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे माझी भेट झाली. तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे भासवत असे. एकदा तो माझ्या भावाला मुलुंडच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे तो सल्लागार होता” लग्नानंतर एका आठवड्यातच तिला कळले की त्याची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय पदवी बनावट आहेत. तिने अमरावती येथे पोलिसात फिर्याद दिली.

“सप्टेंबर 2015 मध्ये, त्याला अटक करण्यात आली आणि सुमारे नऊ महिने त्याला तुरुंगात टाकण्यात आले,” असेही डेंटिस्ट महिलेने सांगितले. काही दिवसातच तिने सोनवणेला घटस्फोट दिला. सोनवणेने मुंबईत अनेक शस्त्रक्रिया केल्या, त्या सर्व शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, असाही दावा तिने केला.

कर्नाटकातील प्राध्यापिकेशीही लगीनगाठ

हेमंत सोनवणेने कर्नाटकातील हुबळी येथील गणिताच्या प्राध्यापक महिलेशी लग्न केले. “माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी आहे. मी ऑगस्ट 2016 मध्ये माझे वडील गमावले, आणि मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पेलू शकणार्‍या एका जबाबदार व्यक्तीच्या शोधात होते, कारण माझी भावंडे अजूनही शिकत होती” असं तिने सांगितलं. सोनवणेने तिला आवश्यक असलेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आणि ते हुबळीला गेले.

“त्याने मला सांगितले होते की तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो, पण नंतर तो मला हॉटेलची बिलं भरायला लावायचा. नंतर त्याने माझे दागिने विकले. हळूहळू, माझ्या कुटुंबाला संशय आला आणि मी त्याला सोडले. मी आता भावनिकदृष्ट्या खचले आहे.” असं प्राध्यापक महिलेने सांगितल्याचं मिड-डेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सोनवणेने हुबळी येथे ऑर्थोपेडिक क्लिनिक उघडले आणि बैलहोंगल, बेळगाव, मुंडगोड आणि नवलगुंड येथील अनेक हॉस्पिटलमध्ये काम केले. त्याने हुबळी-धारवाड महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातही काम केले आहे, असं तिने सांगितलं.

शस्त्रक्रिया चुकल्याने रुग्णांची तक्रार

चुकलेल्या शस्त्रक्रियांनंतर नीट उभेही राहू न शकणाऱ्या 59 वर्षीय रुग्णाने हेमंत सोनवणे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 12 जानेवारी रोजी तिने केलेल्या तक्रारीच्या आधारे सोनवणेच्या विरुद्ध आयपीसीच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत असे नऊ जणांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत, असे वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

Leave a Comment