पिठाच्या पिशवीतून पैसे वाटल्यासंबंधी आमिर खानचा खुलासा, म्हणाला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या लढाईत अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेत असून आर्थिक मदत करत आहेत. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत आमिर खानने पिठाच्या पिशवीतून १५ हजार रुपये वाटल्याचा दावा कऱण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावर आमिर खानने खरंच मदत केली आहे की ही अफवा आहे याबाबत मात्र उलट सुलट चर्चा सुरु होत्या. पण आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानने स्वत: ट्विट करुन यासंबंधी खुलासा केला आहे.

आमिर खानने आपल्याविषयी सध्या चर्चेत असणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचं सांगितलं आहे. यांदर्भात आमिर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला की, ‘मी पिठाच्या पिशव्यांमध्ये पैसे टाकून पाठवणारा व्यक्ती नाही. त्यामुळे कदाचित ही बातमी खोटी किंवा अफवा आहे. किंवा कोणी रॉबिनहुड असेल, ज्याला आपल्या नावाचा खुलासा करायचा नसेल, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, लव्ह यू.’

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आमिर खानने दिल्लीमध्ये पिठाच्या पिशव्यांचे काही पॅकेट्स पाठवले असल्याची माहिती व्हायरस होत होती. तसेच या पिठाच्या पिशव्यांमध्ये 15-15 हजार रूपये लपवून पाठवले जात अलसल्याचंही सांगण्यात येत होतं. तसेच हे प्रकरण 23 एप्रिल रोजी घडल्याचं व्हायरल होणाऱ्या माहितीमध्ये सांगितलं होतं. यादरम्यानचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु, आता स्वतः आमिर खानने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

दरम्यान, आमिर खान कोरोना वॉरियर्ससाठी सतत मदत करत आहेत. परंतु, आमिरला यासंदर्भात खुलासा करायचा नाही की, त्याने पीएम केअर फंड किंवा इतर संस्थांना किती आणि काय मदत केली. यासंदर्भात आमिरचं असं मत आहे की, कोणी, कोणाला किती मदत केली, ही प्रत्येकाची खासगी गोष्ट आहे. या गोष्टी सार्वजनिक करणं योग्य वाटत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment