ताज्या बातम्याबॉलिवुडमुंबई

अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी |अभिनेते गिरीश कर्नाड यांचे आज त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. मागील काही दिवसापासून ते आजारी होते. वृद्धाप काळामुळे त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. त्यांना उपचारासाठी अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर इलाज झाले नाहीत. आज सकाळी शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

 

गिरीश यांनी कन्नडसोबतच हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये काम केलं. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशा सर्व पातळ्यांवर त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला. १९ मे १९३८ मध्ये माथेरानला त्यांचा जन्म झाला होता. १९९८ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सुप्रसिद्ध कन्नड साहित्यकार, रंगकर्मी, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी गिरीश कर्नाड यांची ओळख होती. गिरीश यांना १९७८ मध्ये भूमिका सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय १९९८ मध्ये साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. गिरीश कर्नाड हे असे हरहुन्नरी अभिनेते होते ज्यांनी व्यावसायिक सिनेमांसोबत समांतर सिनेमांमध्येही त्यांनी लैकिक मिळवला. १९७० मध्ये ‘संस्कार’ या कन्नड सिनेमातून त्यांनी  सिनेसृष्टीत पदार्पण केले. तर १९७४ मध्ये आलेल्या जादू का शंख या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गिरीश कर्नाड हे सलमान खानच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या सिनेमांसाठी ओळखले जातात.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares