हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट विक्रम वेधा चा हिंदी रिमेक लवकरच येणार असे अनेक गॉसिप रंगले होते. २०१७ साली आर माधवन आणि विजय सेतुपति या दोन दिग्गज कलाकारांनी ‘विक्रम वेधा’ या दक्षिणात्य सिनेमातील मुख्य भूमिका बजाविल्या होत्या. त्यामुळे ह्या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याबाबत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. दरम्यान या हिंदी रिमेकसाठी आमिर खानची निवड झाली होती. मात्र आमिरने हा चित्रपट करण्यास अस्वीकृती दर्शविली. त्यानंतर या चित्रपटासाठी अभिनेता हृतिक रोशनची वर्दी लागल्याचे समोर येत होते. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हृतिकने देखील हा चित्रपट सोडला आहे. दरम्यान या बाबत केवळ चर्चा उठल्या होत्या. पण आता खरोखरीच त्याने हा चित्रपट सोडून दुसऱ्या चित्रपटात रस दाखविला आहे.
After #AamirKhan, Now #HrithikRoshan Also Steps Out Of #VikramVedha Remake?#VikramVedhaRemake @iHrithikhttps://t.co/HGm5U2Evix
— Box Office Worldwide (@BOWorldwide) May 5, 2021
दरम्यान हा चित्रपट न करण्यासाठी अभिनेता आमिर खान याची अनेक विविध कारणे होती. मात्र हृतिकसोबत चर्चा केल्यानंतर ह्या चित्रपटासाठी त्याने स्वीकृती दिली होती. मात्र अचानक आता त्यानेही हा चित्रपट करण्यासाठी माघार घेतली आहे. त्याऐवजी ‘द नाईट मॅनेजर’ची हिंदी आवृत्ती करण्यासाठी हृतिकने तयारी दाखवली आहे. हृतिक बऱ्याच वेळेला ऐनवेळी चित्रपटांसाठी नकार देतो. यामुळे जोपर्यंत तो फ्लोअरवर शूटिंगला दाखल होत नाही, तोपर्यंत त्याला गृहीत धरता येत नाही. त्यामुळे अनेकदा निर्माते अडचणीत येऊ शकतात.
https://www.instagram.com/p/CNPq6vPhenL/?utm_source=ig_web_copy_link
आता विक्रम-वेधा या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी हृतिक उपलब्ध आहे, असे गृहीत धरून निर्मात्यांनी चित्रीकरणाची पूर्ण तयारी सुरू केली होती. मात्र अचानक हृतिकने चित्रपट करण्यासाठी माघार घेतल्यामुळे निर्मात्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आता पुन्हा नवीन नायकाचा शोध घेण्याच्या या मोहिमेवर सर्वजण रुजू झाले आहेत. हृतिक या वर्षा अखेरीस ‘फायटर’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. त्यानंतर ‘क्रिश-४’ या चित्रपटाचे देखील चित्रीकरण चालू होईल असा अंदाज आहे.