मुंबई । बॉलीवूडमधील कपूर घराण्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच वर्षी राजीव कपूर राजीव यांचे भाऊ ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असतानाच कपूर कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे.
राजीव कपूर यांचे मोठे भाऊ अभिनेते रणधीर कपूर यांनी स्वतः त्यांचे निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’
नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं. राजीव कपूर यांच्या राम तेरी गंगा मैली’ (१९८५) आणि ‘एक जान हैं हम’ (१९८३) मधील अभिनयासाठी आजही ते प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.
मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.