संजय दत्तचा गौप्यमय नागपूर दौरा; ऊर्जामंत्री नितीन राऊतांसह केंद्रीय मंत्री गडकरींची घेतली भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने सदिच्छा भेट घेतली आहे. संजय दत्त याने नागपूर येथील नितीन राऊत यांच्या बेझनबाग निवासस्थानी जाऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली आहे. संजय दत्त यांच्या सोबतचे फोटो ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत याने शेअर केले आहेत. नितीन राऊत यांची भेट घेतल्यानंतर संजय दत्त याने तात्काळ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वर्धा रोड येथील घरी भेट दिली. इथे संजय दत्त याने नितीन गडकरी यांना वाकून नमस्कार देखील केला आहे. या भेटीचे देखील फोटो आता समोर आले आहेत.

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत गेल्या फेब्रुवारी महिन्यात विवाह बंधनात अडकला. दरम्यान २१ फेब्रुवारी २०२१ रोजी यासाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. मात्र कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ रद्द करण्यात आला होता. यामुळे अनेक पाहुण्यारावळ्यांच्या काही भेटी होऊ शकल्या नाहीत. यातीलच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त. तसे त्याचे खाजगी कारण होतेच, तरीही वेळात वेळ काढून संजयने या स्वागत समारंभास नक्कीच भेट दिली असती. मात्र हा समारंभच रद्द केल्याने हि भेट काही होऊ शकली नाही. यामुळे संजय दत्तने काल ५ जून २०२१ शनिवारी अचानक नागपूरला जाऊन या नवविवाहित दाम्पत्याची भेट घेत त्यांना शुभाशीर्वाद दिले. यासोबत संपूर्ण कुटुंबासोबत या छोटेखानी भेटीतही भरपूर गप्पा मारल्या आणि यानंतर निरोप घेतला.

तसे पाहता राऊतांना भेटण्यासाठी कारण होते हे समजले मात्र त्यानंतर संजय दत्तने थेट गडकरींच्या घराची वाट धरली आणि त्यांचीही भेट घेतली, हे थोडं नवल वाटण्याजोगे आहे. दरम्यान, या भेटीचा आणि नागपूर दौऱ्याच्या गुपिताचा नेमका उलघडा झालेला नाही. या भेटीमागील तपशील अद्याप जरी कळू शकला नसला तरी संजय दत्त यांचे जवळचे मित्र संजय दुबे यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले की, हा त्यांचा खाजगी दौरा होता. ही फक्त सदिच्छा भेट होती. त्यामुळे ही भेट झाल्यानंतर ते मुंबईला परतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त हा शनिवारी नागपूरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्याने या दोन्ही नेत्यांची थेट त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. संजय दत्त याने या दोन्ही नेत्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट का घेतली? या भेटीमागे नेमके काय कारण आहे? यात भेटींचा राजकीय वर्तुळावर काय परिणाम होणार?? याबाबत आता अनेक विविध समीकरणांसह वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटीतील संवादांमध्ये संजय दत्तची नेमकी काय चर्चा झाली हेही अद्याप समजू शकलेले नाही. तसे एकीकडे ही फक्त सदीच्छा भेट असल्याचे जरी सांगितले असले तरी मग या भेटीबाबत एवढी गहन गुप्तता का पाळण्यात आली होती, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment