आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; 20 तारखेपर्यंत कोठडीत वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. त्यानंतर त्याला 20 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. २० रावजी त्याच्या जामिनावर आता सुनावणी होणार आहे.

एनसीबीच्यावतीने आज आर्यन खानला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर खान यांच्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. यापूर्वीही एनसीबीने खान याला कोर्टात हजर केले होते. त्यावेळी कोर्टाने खान याची कोठडी वाढविली होती.

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं होत. दरम्यान त्यांच्या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात युक्तिवाद पार पडला. तो कोर्टाने समजूनही घेतला. वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाच्यावतीने निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये आर्यनखांशी इतरांची पाच दिवस कोठडी वाढविली असून आर्यन खानच्या जामिनावर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

You might also like