महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?? ; सोनू सूदने दिली ‘या’ दिग्गज नेत्याला पसंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाऊन च्या काळात गरिबांच्या मदतीला धावून जाणार सोनू अनेक अनेक लोकांसाठी देवदूत बनला. आपल्या दिलदार वृत्तीमुळे सोनूने अनेकांची मने जिंकली. याच पार्श्वभमूीवर सोनू सूदला ‘लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द ईयर अवॉर्ड’ ने सन्मामित करण्यात आलं. यावेळी सोनूची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्याला महाराष्ट्रातील आवडता नेता कोणता?, असा सवाल करण्यात आला. यावर सोनूने लक्ष वेधूून घेणारं उत्तर दिलं.

खरं तर महाराष्ट्रातील आवडता नेता कोण?, या प्रश्नामुळे आपण संकटात पडल्याचं सोनूने मिश्किलपणे म्हटलं. मात्र त्यानंतर सोनूने थोडा वेळ घेतला आणि विचार केला अन्  महाविकास आघाडीचे सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतलं.

दरम्यान, यावेळी सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही कौतुक केले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अतिशय प्रामाणिक आणि नम्र आहेत. उद्धव ठाकरेंना भेटून खूप सकारात्मकता मिळाली मी हे अनेकदा सांगत आलो असल्याचं सोनू म्हणाला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like