दिशा पटानीच्या मते भारतीय क्रिकेट संघातील ‘हा’ खेळाडू आहे मॅच विनींग

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री दिशा पटानी भारतीय क्रिकेट संघातील एका खळाडूच्या कामगिरीने चांगलीच प्रभावित झालेली आहे. दिशाने भारतीय संघातील या खेळाडूला मॅच विनींग खेळाडू म्हणून पसंती दिली आहे. तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नक्कीच एक तर किंग विराट कोहली किंवा हिटमॅन रोहित शर्मा असणार मात्र, दिशाने या दोघांव्यतिरिक्त दुसऱ्याच एका खेळाडूला भारतीय संघासाठी मॅच विनींग खेळाडू असल्याचं सांगितलं आहे.

un (37)

नुकतेच मलंग या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिशा, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु असताना Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात आलेली होती. यावेळी तुझ्या दृष्टीकोनातून भारतीय संघातला मॅच विनर खेळाडू कोण असं कार्यक्रमाच्या निवेदकानं दिशाला विचारलं असता दिशाने जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. ”जर मला मॅच विनींग खेळाडूची निवड करायची असेल तर मी बुमराहला निवडेल . आताच्या घडीला तो संघातला सर्वोत्तम खेळाडू आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत तो चांगली कामगिरी करेल अशी मला अपेक्षा आहे.” असं दिशा म्हणाली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here