व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटामध्ये ‘ही’ अभिनेत्री करतेय बॉलीवूड मध्ये पदार्पण…

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आले होते. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु, आतापर्यंत या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात होते. मात्र, आता या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या प्रसिद्ध तेलगू चित्रपटातील अभिनेत्री शालिनी पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

 

दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सला प्रतिक्रिया देताना शालिनीने सांगितले की, मी रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे, असंही शालिनी म्हणाली. .

 

‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटासाठी शालिनीने ऑडिशनही दिली आहे. सध्या शालिनीचं वय 25 वर्ष आहे. शालिनीने आपल्या करिअरची सुरूवात तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश करून केली. या चित्रपटात रणवीर एका गुजराती मुलाची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी रणवीरने आपलं वजन कमी केलं आहे. रणवीरने आतापर्यंत सर्वच चित्रपटात दमदार भूमिका केल्या आहेत. त्यामुळे जयेशभाई जोरदार चित्रपटात रणवीरला पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.