कंगनाही ड्रग्ज घेत असल्याचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनचा खुलासा; ४ वर्षांपूर्वीची क्लिप व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कंगना सातत्याने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर दोषारोप लावते आहे. कंगनाने आतापर्यंत बॉलीवूडमधील अनेकांवर साधला आहे. दरम्यान,  कंगना आता वादात अडकण्याची शक्यता आहे. अध्ययन सुमन म्हणजे शेखर सुमन यांचा मुलगा आणि कंगना हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते ही गोष्ट नवी नाही. त्याच अनुषंगाने अध्ययनने ४ वर्षापूर्वी दिलेली एक मुलाखत व्हायरल होते आहे, यात कंगना अमली पदार्थाचं सेवन सर्रास करत होती असा दावा अध्ययनने केला आहे.

अध्ययन सुमनने दिलेल्या एका मुलाखतीत कंगना कशी अमली पदार्थाचं सेवन करत होती ते सांगितलं आहे. कंगना हॅश या अमली पदार्थाचं सेवन करत होती असं तो सांगतो. तो म्हणतो, ‘अमली पदार्थाचं सेवन हे कंगनासाठी नवं नाहीय. ती हॅश हे ड्रग घेत होती. माझ्यासमोर तिने घेतलं आहे. इतकंच नव्हे तर ती कोकेनही घेत असावी. तिने कोकेन माझ्यासमोर घेतलेलं नाही. पण हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली आहे पण मी कधी घेतलं नाही.’

अध्ययनच्या या स्पष्टीकरणानंतर मुलाखतकाराने त्याला प्रतिप्रश्नही केला. उद्या तू हे स्टेटमेंट देतो आहेस. पण कंगनाने याला नकार दिला तर? असं विचारल्यावर अध्ययन म्हणतो, ‘ती हे नाकारेलच. पण तिच्यात जरा जरी खरेपणा असेल तर ती हे कबूल करेल.’ ही क्लिप व्हायरल होऊ लागली आहे. एकिकडे सुशांतच्या या प्रकरणात नार्कोटिक्स कमिशन ब्युरोही आता सहभागी झाला असतानाच अध्ययनची ही क्लिप पुन्हा फिरणं हे कंगनाची नवी डोकेदुखी ठरू शकते.

Adhyayan Suman EXPLOSIVE Full Interview | Kangana Ranaut | Hrithik Roshan

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment