बॉलिवूडवर कोरोनाचा कहर, क्रिती सेननलाही झाली कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊननंतर सिनेमाचं शूटींग पुन्हा सुरू झालं आहे. पण शूटींग सुरू होताच मोठ्या प्रमाणात कलाकार मंडळी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. अभिनेता वरूण धवन कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर आता अभिनेत्री क्रिती सेनन कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. ती तिच्या सिनेमाचं शूटींग करताना पॉझिटिव्ह झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिती राजकुमार रावसोबत आगामी सिनेमाचं शूटींग करण्यात बिझी होती. यादरम्यानच ती कोरोनाची शिकार झाली. ही शूटींग चंडीगढमध्ये सुरू होती. जेव्हा क्रिती सेनन मुंबईला परत आली तेव्हा तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, क्रिती सेननने सोमवारी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, नुकताच अभिनेता वरूण धवन, अभिनेत्री नीतू कपूर, अभिनेता-होस्ट मनीष पॉल आणि इतरही काही कलाकार कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. अशात कोरोनाचं संकट बॉलिवूडवर बघायला मिळत आहे.

दरम्यान, अभिनेता वरूण धवन सोमवारी सिनेमाचं शूटींग करताना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्याने इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली. त्याने लिहिले की, ‘व्हिटॅमिन फ्रेंड्स, कोरोना काळात कामावर आलो तर कोविड-१९चा शिकार झालो’.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’