विद्या बालनचा ‘शेरनी’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज; येत्या जूनमध्ये होणार ओटीटीवर प्रदर्शित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सध्या तिच्या अनोख्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॉमेझोन प्राईमवर रिलीज होणार आहे. शेरनी’च्या निर्मात्यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. ट्विटमध्ये दाखवलेल्या ‘शेरनी’च्या पोस्टरमध्ये विद्या बालनचा चेहरा अत्यंत करारी दिसतो आहे. तर अन्य एका फोटोमध्ये विद्याच्या हातात सॅटेलाईट फोन दिसत आहे.

शेरनी चित्रपटातील विद्याचा लूक खरोखरीच प्रेक्षकांसाठी अनोखा आहे. ‘शेरनी’च्या विविध पोस्टरमध्ये विद्या वेगवेगळी दिसतेय. या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरमध्ये तिचा चेहरा गनच्या पॉईंटर रडारमध्ये दिसतो आहे. तिच्यावर लक्ष ठेवणार्यांनी तिच्यावर नेम धरला असल्याचा अर्थ यातून अगदी सहज लक्षात येतो. चित्रपटाच्या ‘शेरनी’ या नावातूनच विद्याचा रोल संघर्षमायी आणि आक्रमक असणार हे समजते. या चित्रपटात विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. वन्यजीव आणि माणसामधील संघर्षाची किनार असलेल्या या चित्रपटात वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी केलेली लढत बघायला मिळणार आहे.

अभिनेत्री विद्या बालनचा ‘शेरनी’ हा आगामी चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट संपूर्ण जगभरात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासह शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार अन्य मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे कथानक अत्यंत रंजक असून प्रेक्षकांना एका जागी खिळवणारे आहे.

Leave a Comment