अल्लू अर्जुनचा नवा चित्रपट ‘पुष्पा’ असणार चंदन तस्करीवर आधारित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलगू स्टार अल्लू अर्जुन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू आज ३७ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक सोशल मीडियावर जाहीर केले आहे. यासह त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

या चित्रपटाचे नाव ‘पुष्पा’ असेल. सुकुमार दिग्दर्शित चित्रपटाच्या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अल्लू रफ अँड टफ लूकमध्ये दिसला आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर स्टारच्या क्लोजअपवर आधारित असताना दुसर्‍या पोस्टरमध्ये तो जमिनीवर बसलेला दिसत आहे, तर पोलिस त्याच्या पाठीमागे उभे आहेत आणि वाहनात चंदन भरले जात आहे. हा चित्रपट चंदनच्या तस्करीवर आधारित असल्याच्या वृत्तावर या पोस्टरद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अल्लू अर्जुनने ट्वीट केले, “माझ्या पुढच्या पुष्पा चित्रपटाचे पहिले रूप आणि शीर्षक. प्रिय सुकुमार गारु दिग्दर्शित. याबद्दल खूप उत्साही आहे. आशा आहे की आपणा सर्वांना ते आवडेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment