अमिताभ, आयुष्मानचा ‘गुलाबो-सीताबो’ चित्रपट १२ जूनला होणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सम्पूर्ण सिने सृष्टी बंद झाली आहे. देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच चित्रपटांचे प्रदर्शनदेखील थांबले आहे. अशावेळी लॉकडाऊन संपण्याची काही चिन्हेही दिसेनात त्यामुळेच काही चित्रपट निर्माते आता आपले चित्रपट हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा विचार करीत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना अभिनित चित्रपट ‘गुलाबो-सीताबो’ हा १२ जून रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारा शुजित सरकारचा ‘गुलाबो-सीताबो’ पहिलाच चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर दाखविला जाईल. आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयीची माहितीही दिली आहे.

‘गुलाबो-सीताबो’चे पोस्टर शेअर करताना आयुष्मानने लिहिले की- “आम्ही अ‍ॅडव्हान्समध्येच आपल्या सर्वांना बुक करतोय. गुलाबो-सीताबोचा प्रीमियर हा १२ जून रोजी अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार आहे. तर मग फर्स्ट डे, फर्स्ट स्ट्रीम पहायला या.”

‘गुलाबो-सीताबो’या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या प्रदर्शनाविषयी माहिती देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले – “एका सन्माननीय व्यक्तीची आणि त्याच्या अनोख्या भाडेकरूची कहाणी.”

‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट याआधी १७ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता, पण कोरोना या साथीमुळे घरीच बसावे लागलेल्या प्रेक्षकांना हा सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवण्याची जबाबदारी आता ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवर आली आहे.

मागे मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार म्हणाले होते की, ” ‘गुलाबो-सीताबो’ साठी त्यांच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. एक चित्रपट निर्माता म्हणून मला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला बघायचा आहे पण आता परिस्थिती अशी आली आहे की आवश्यक असल्यास मी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास तयार आहे पण आम्ही ३ मे नंतरच यावर निर्णय घेऊ.”

गुलाबो-सीताबो मधील अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा लूक यापूर्वीच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. यापूर्वी हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, त्यानंतर तारीख १७ एप्रिल करण्यात आली.

‘गुलाबो-सीताबो’ साठी आयुष्मान खुराना आणि शुजित सरकार हे दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. आयुष्मानने याआधी ‘विक्की डोनर’ आपल्या या डेब्यू चित्रपटात शूजित सरकारसोबत काम केले होते. तसेच अमिताभ बच्चन यांनी ‘पीकू’ चित्रपटात शुजित सरकारसोबत काम केले आहे. दीपिका पादुकोण आणि इरफान खान देखील ‘पीकू’ मध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment