Wednesday, February 1, 2023

यामुळेच अमिताभ बच्चन ऋषी कपूरला भेटायला कधीही रूग्णालयात गेले नाही, जाणून घ्या

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूरने ३० एप्रिल रोजी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ते बर्‍याच काळापासून कर्करोगाशीही लढाही देत होते. ऋषी कपूर यांचे निधन झाल्याची बातमी अमिताभ बच्चन यांनी ट्वीटद्वारे दिली होती. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूरची आठवण ठेवणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

कपूर यांच्या अंत्यसंस्कारात अमिताभ बच्चन उपस्थित राहिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या ‘सरगम’ चित्रपटाची भावनिक पोस्ट म्हणून डफली गाण्याचे व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी ऋषी कपूरबरोबरची आपली पहिली भेट आणि त्यांना रुग्णालयात न भेटल्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी लिहिले – चिंटूशी माझी पहिली भेट त्यांच्या घरी झाली होती. कपूर यांचे वडील राज कपूर यांनी मला एकदा त्यांच्या घरी बोलावले होते. माझ्या पहिल्या भेटीतच चिंटू खूप खोडकर आहे हे मी ओळखले होते.

- Advertisement -

अमिताभ बच्चन म्हणाले की आम्ही बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. सेटवर तो नेहमी हसत असायचा.जर तो जवळच असेल तर कोणतेही प्रेशर तुम्हांला येणार नाही. मात्र, यानंतर बॉबी या चित्रपटामुळे ऋषीशी माझ्या भेटी सतत वाढत गेल्या. “मला त्याच्या हसतमुख्या चेहर्‍यावर त्रास कधीच पहायचा नव्हता, परंतु मला खात्री आहे की जेव्हा तो गेला तेव्हा तो हसत हसतच गेला असावा.”

अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले- ऋषी कपूर कितीही आजारी असले तरी ते रुग्णालयात जाताना पूर्णपणे सामान्य दिसत होते. जणू काहीच झाले नाही आणि ते नेहमी म्हणायचे की मी ठीक आहे. मी कधीच त्याला भेटायला रुग्णालयात गेलो नाही. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यावरचे दुःख मला कधीच दिसले नाही. मला माहित आहे जेव्हा तो गेला असेल तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर हास्यच असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.