बॉलिवूडला आणखी धक्का! मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन; रितेश देशमुख भावूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

सोमवारी सकाळपासून निशिकांत यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र त्यावेळी ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं. आता दुपारी साडे ४ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘निशिकांत कामत यांना ३१ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या २ वर्षांपासून ते लिव्हर सिरॉसिस Liver Cirrhosis या आजाराचा सामना करत होते. आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला’, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली. ‘मित्रा, तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्याला शांती लाभो’, अशा शब्दांत रितेशने भावना व्यक्त केल्या.

निशिकांत कामत यांच्या चित्रपट कारकिर्दीवर नजर टाकल्यास दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान, फोर्स यांसारख्या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपला वेगळा ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम आणि भावेश जोशी सारख्या चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment