बॉलिवूडमधील प्रसिद्ध व ज्येष्ठ कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक मारुतीराव काळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व सुपरहिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी सहजोगत्या केले होते. ‘सौदागर’, ‘डिस्को डान्सर’ अशा हिट चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांच्या नावावर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना विष्णूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. पण अखेर त्यांची ही कोरोनाशी सुरु असलेली झुंज अयशस्वी ठरली आणि कोरोनाने त्यांचा वयाच्या ९२ व्या वर्षी बळी घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मारुतीराव काळे हे बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध कला दिग्दर्शकांपैकी एक नाव जरूर आहे. मात्र ते मूळ मराठी होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील १०० हून अधिक चित्रपटांचे अव्वल व लक्षात राहतील असे सेट तयार केले होते. १९६० साली आलेल्या आणि अत्यंत गाजलेल्या ‘मुघल-ए-आजम’ या चित्रपटासाठी देखील त्यांनी काम केले होते. मारुतीराव काळे यांची मुलगी कल्पना काळे यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

https://www.instagram.com/p/CPlKMWhtNv4/?utm_source=ig_web_copy_link

 

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईतील बांद्रा येथे होली फॅमिली रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ७ मे २०२१ला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रुग्णालयीन उपचारादरम्यान त्यांची सातत्याने तब्येत खालावत होती. उतार वय असल्याने ते कोरोना विषाणूंवर मात करू शकले नाहीत आणि अखेर गेल्या गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मारुतीराव यांनी ‘इमान धरम’, ‘डिस्को डान्सर’, ‘कसम पैदा करनेवाले की’, ‘डान्स डान्स’, ‘कमांडो’, ‘अजूबा’, ‘सौदागर’ यांसारख्या सुपरहीट चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय काम केले होते. उत्कृष्ट सेट्स डिझाईन करून प्रेखकांसमोर हुबेहूब देखावा तयार करून ठेवणे यात त्यांचा हातखंडा होता आणि त्यांचे काम हीच त्यांची ओळख. त्याआधी त्यांनी सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘दीवार’,’रझिया सुल्तान’, ‘पाकिजा, ‘शोर’, ‘कभी कभी’, ‘दो अंजाने’, ‘मेरा साया’, ‘यादगार’, ‘जांबाज’ अशा लोकप्रिय चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच काम हे बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी कायमच अविस्मरणीय ठरणार आहे. त्यांचे निधन हि बॉलिवूड सृष्टीची मोठी हानी आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Comment