बॉलिवूड दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर; सायरा बानू यांनी फोटो शेअर करीत दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत असल्याने त्यांना तातडीने रविवारी सकाळी मुंबईतील नॉन कोविड हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू या दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून क्षणाक्षणाची माहिती त्यांच्या चाहत्यांना देत होत्या. नुकताच त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत हा काहीच तासांपूर्वीचा फोटो असल्याचे त्यासोबत लिहिले आहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1401889531847135233

दिलीप कुमार यांना बिलेट्रल प्ल्युरल इफ्यूजनमुळे (Bilateral Pleural Effusion) आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. हा एक असा आजार आहे ज्यात छातीत फुफुसांच्या भागात पाणी साठल्याने रुग्णास श्वास घेणे कठीण होते. यामुळे दिलीप कुमार यांनी आयसीयूत ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तथापि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. डॉ. जलील पारकर यांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठीक राहिले तर दिलीप कुमार यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे ९८ वर्षांचे आहेत. त्यांना गेल्या महिन्यातही हिंदुजा रूग्णालयातच दाखल करण्यात आले होते. मात्र तेव्हा रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी स्पष्ट केले होते. कोरोना संक्रमणामुळे गतवर्षी दिलीप कुमार यांनी आपल्या दोन लहान भावना गमावले आहे. २१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. दरम्यान ते ८८ वर्षांचे होते. यानंतर २ सप्टेंबर २०२० रोजी आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. तेव्हा ते ९० वर्षांचे होते. यानंतर दिलीप कुमार बरेच खचले होते.

Leave a Comment