Sunday, March 26, 2023

बॉलिवूड अभिनेता मनोज तिवारी यांच्या बद्दल कमाल खान याने काढले हे उद्गार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा कल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागला आहे, तर भारतीय जनता पक्षाने २०१५ च्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी थोडीफार चांगली कामगिरी केली आहे पण यावेळी दिल्लीत विजय मिळविण्यावरुन भाजपा ट्रोल होत आहे. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक कमाल आर खान याने ट्विट केले आहे , या ट्विट मध्ये कमाल आर खान याने भाजप नेते मनोज तिवारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कमाल आर खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, “बिग बॉसच्या घरात डॉली बिंद्राकडून मनोज तिवारी अंडी घेऊ शकले नाहीत आणि केजरीवाल यांच्याकडून दिल्ली घेण्याचे स्वप्न ते पाहत होते. कमाल आर खान दिल्ली निवडणुकांच्या निकालाबाबत सतत ट्विट करत असतात आणि त्यांचे ट्विटही खूप व्हायरल होत आहे. कमाल आर खानने मनोज तिवारी यांना त्यांच्या बिग बॉसच्या दिवसांची आठवण करून दिली. ‘बिग बॉस 4’ मध्ये मनोज तिवारी दिसला होता.

- Advertisement -

कमाल आर खान याच्याविषयी बोलायचे झाल्यास हा बॉलिवूड कलाकार सध्या सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘देशद्रोही’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कमल आर खाननेही ‘बिग बॉस 3’ च्या माध्यमातून बरेच मथळे बनवले होते. कमाल आर खान त्याच्या मतांबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चेत असतात. समकालीन विषयांवर आपले मत मांडण्याबरोबरच ते बॉलिवूड चित्रपटांचा आढावा घेतात.