BREAKING NEWS ज्येष्ठ प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ व प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन झाले आहे. त्यांचे मूळ नाव विजय पाटील होते. दरम्यान ते नागपूर येथे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती. अखेर वयाच्या ७८ व्या वर्षी काल रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक लोकप्रिय गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मिळाल्यानंतर इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

राम लक्ष्मण यांचे मूळ नाव विजय काशीनाथ पाटील आहे. वयाची २० वर्षे ओलांडल्यावर विजय पाटील यांनी नागपूर सोडून थेट मुंबई गाठली आले. आपल्यातील कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि जम बसविला. त्यांनी इंडस्ट्रीत आपली ओळख संगीतकार राम लक्ष्मण म्हणून प्रस्थापित केली. राम लक्ष्मण यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. मराठीतच नाही तर हिंदीतही त्यांनी एकापेक्षा एक दमदार आणि लोकप्रिय अशी सदाबहार गाणी दिली. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या मराठी चित्रपटांसह राजश्री प्रोडक्शनच्याही अनेक चित्रपटांना त्यांनी एकापेक्षा एक सर्रास गाणी दिली आहेत. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली आणि ‘साँच को आँच नहीं’, ‘तराना’, ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमधील गाण्यासाठी त्यांनी संगीत दिले.

विजय जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रे त्यांच्याशी झाली. ते बासरीवादक म्हणून कार्यरत होते. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रे यांना आपल्या आगामी चित्रपटाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन या टोपण नावाने बोलावले जायचे. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडीचे नामकरण राम – लखन (लक्ष्मण) असे करून टाकले. नंतर किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचे आकस्मिक निधन झाले. या काळात विजय यांना ‘एजंट विनोद’ चित्रपटाचे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत केवळ लक्ष्मण नावाने संगीत देणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी राम-लक्ष्मण नाव कायम ठेवले.

Leave a Comment