बॉलिवुड

प्रियांकाच्या वाढदिवसाला निकने आणलेल्या केकची किंमत वाचून तुम्ही व्हाल थक्क

नवी दिल्ली | आपल्या अदाकारीने करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे देसी गर्ल प्रियांका चोप्रा. तिचा १८ जुलै रोजी वाढदिवस होता. तिच्या या वाढदिवसाला तिचा पती निकने आणलेला केक सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरला आहे. देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या वाढदिवसाला निकने पाच थराचा एक स्पेशल केक आणला होता. तो केक पाहून निकचे प्रियांकावर किती प्रेम आहे या बद्दल उपस्थितीतांमध्ये चर्चा सुरु झाली एवढा तो केक आकर्षक होता.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेसकडून या तरुण नेत्याला उमेदवारी?

निकने प्रियांकाच्या वाढदिवसाला ‘डिव्हाइन डेलिकसीज केक्स आणला होता. हा केक लाल आणि सोनेरी रंगाचा होता. प्रियंकाने ज्या रंगाची कपडे परिधान केली होती. त्याच रंगाचा तो केक होता. प्रियांका वाढदिवसाच्या पोशाख देखील युनिक लूकमध्येच दिसत होती. तर तिच्या वाढदिवसाला जो केक आणण्यात आला होता त्या केकची किंमत तब्बल ५,००० युएस डॉलर म्हणजे भारतीय ३ लाख ४५ हजार एवढी होती.

सी.सी.डि या नामांकित कॉफी कॅफेचे मालक गायब

पती नीक, आई मधू चोप्रा आणि बहीण परिणीती चोप्रा यांच्यासोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. प्रियांका चोप्रा हिने आपल्या वाढदिवसाला परिधान केलेला पोशाख आणि निकने घातलेला पिवळ्या रंगाचा शर्ट यामुळे या दोघांची जोडी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. दरम्यान प्रियांका चोप्रा हिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या देखील माध्यमात सतत झळकू लागल्या आहेत. प्रियांका अथवा तिच्या परिवाराकडून या बद्दल अधिकृत दुजोरा मिळाला नाही तरी देखील हे बातम्यांचे लोन थांबत नाही.

इंदापूरच्या जागेवरून पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीत कलगीतूर ; जागा सोडण्यास शरद पवारांचा नकार

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares