ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती चिंताजनक; मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात केले दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील दिग्गज व ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बघता बघता अचानक बिघडली. त्यांच्या अस्थिर तब्येतीकडे पाहता त्यांना त्वरित मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास अत्याधिक त्रास जाणवत होता. यादरम्यान त्यांच्यावर त्यांच्या घरीच योग्य ते उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे दिसून आले. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता त्यांना तातडीने हिंदुजा रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1401417347592691715

ए एन आय कडून मिळालेल्या माहितीनुसार, तूर्तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. सध्यातरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे त्यांची पत्नी सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. लवकरच त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र दिलीप कुमार यांची आताची प्रकृती पाहता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर येताच अनेकांनी त्यांच्याविषयी काळजी डार्वित सोशल मीडियावर त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

कोरोना संक्रमणामुळे गतवर्षी दिलीप कुमार यांच्या दोनही लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी २१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. दरम्यान ते ८८ वर्षांचे होते. यानंतर २ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला. या दरम्यान ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर दिलीप कुमार अत्यंत दुखी होते. दिलीप कुमार व सायरा बानो याना बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. सायरा बानो नेहमीच सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत असतात. त्यांची सेवा करत असतात. ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. आताही दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली असता सायरा बानो अत्यंत काळजीत आहेत.

Leave a Comment