शेतकरी आंदोलनावर सलमान खाननं केलं भाष्य, म्हणाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनावरून जागतिक स्तरावर मोदी सरकाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या सुरात सूर मिसळत ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. मात्र, काही सेलिब्रिटींची अद्यापही ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशीच भूमिका आहे. पण, एका कार्यक्रमादरम्यान, पत्रकारांनी सलमान खानला बोलतं केलं.

गुरुवारी सलमान खान मुंबईतील एका म्युझिक शोच्या लाँचिंगसाठी आला होता, त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सलमानला प्रश्न विचारण्यात आला. देशातील शेतकरी आंदोलनावर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्संने आपलं मत व्यक्त केलंय. त्यावर, आपली काय भूमिका? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. त्यावेळी, सलमानने बचावात्कम पवित्रा घेत समतोल उत्तर दिलंय.

”नक्कीच मी यासंदर्भात भाष्य करेल, जे योग्य आहे ते व्हायलाच हवं, उचित व्हायलाच हवं, बरोबर ते बरोबर व्हावे, सर्वांसाठी!” असे उत्तर सलमान खानने मीडियाशी बोलताना दिले. त्यामुळे, सलमानने दिलेल्या उत्तराचा नेमका अर्थ काढायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. सलमानने ना थेट शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले, ना विरोध. त्यामुळे, सलमान काहीतरी बोलला पण ते न बोलण्यासारखं होत असं म्हणावं लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment