या बाॅलिवुड अभिनेत्यांनी जाहीर केला नरेंन्द्र मोदींना पाठींबा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली प्रतिनिधी | विवेक ओबेरॉय, कंगना रणौत, पूनम ढिल्लो, गजेंद्र चौहान आणि कुस्तीपटू ‘द ग्रेट खली’ या दिग्जांनी आज दिल्लीतील भाजपा कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा घोषित केला.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडलं आहे. याआधी कलाविश्वातील जवळपास ९०० कलाकारांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. तर काही कलाकारांनी मोदींना विरोध दर्शवला होता. त्यामुळे कलाविश्वामध्ये मोदी समर्थक आणि मोदी विरोधक असे दोन गट तयार झाल्याचे दिसते.

रविवारी भाजपाने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ‘सेलिब्रिटी विथ मोदी’ या कार्यक्रमात विवेक ओबेरॉय, कंगना रणौत, बोनी कपूर,मालिनी अवस्थी, पुनम ढिल्लो, प्रल्हाद कक्कर, गजेंद्र चौहान, मनोज जोशी यासारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहत मोदींना जाहीर पाठिंबा दर्शवला.

Leave a Comment