दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या CBI चौकशीस मुंबई हाय कोर्टाचा नकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Probe) मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यासह, ‘जर कोणाला या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा,’ असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

याचिकाकर्ते, दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे अशी याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. उलट, तुम्ही दिशाचे कोण?, असा प्रतिप्रश्न कोर्टाने याचिकाकर्त्याला विचारला. दिशा सालियनच्या मृत्यूबाबत काही घातपाताची शक्यता वाटल्यास तिचे कुटुंब यासंबंधी कायदेशीर पावले उचलेल, असे म्हणत याचिकाकर्त्याला फटकारले आहे.

मुंबई पोलिसांनी दिशा प्रकरणात कोणालाही काहीही सांगायचे असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा असे जाहीरपणे म्हटल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांशी या बाबत काहीच चर्चा न करता कोर्टाचा दरवाजा ठोठावल्याने सदर याचिका फेटाळण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानेही फेटाळली याचिका

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीची (CBI Investigation) मागणी करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयात वकील पुनीत कौर धांडा यांनी दाखल केली होती. या याचिकेत सुशांत आणि दिशा यांच्या आत्महत्याचे एकमेकांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत, याचिका फेटाळून लावली होती.

सुप्रीम कोर्टाने सदर याचिका फेटाळत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी तपास करणाऱ्यांना फटकारले होते. या प्रकरणात सुनावणीसाठी कोणी का हजर नाही? मागील तारखेलाही कोणीच सुनावणीसाठी का हजार नव्हते? असे असेल तर न्यायालयाने काय करावे?, असे प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 14 जून रोजी सकाळी आत्महत्या केली. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. शिवाय, दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाऊननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता. (Bombay High Court dismisses a PIL seeking CBI probe into the death of Disha Salian)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment