व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बोंडारवाडी धरणाचा निर्णय 10 दिवसात घ्यावा, अन्यथा पाणी अडवणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी बोंडारवाडी धरणाला मंजुरी देण्याबाबत येत्या 10 दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

यासंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्यासह जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, बबनराव बेलोशे, राघव बिरामणे, नाना जांभळे, सागर धनवडे, बाजीराव सुर्वे, सुभाष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, ऐन उन्हाळयात फेबुवारी, मार्च, एप्रिल, मे या चार महिन्यात जनतेला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. तेव्हा राज्य शासनाने पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी शिल्लक असलेले पाणी देण्याबाबत औंध व अन्य ठिकाणी दिलेल्या मंजूरीच्या धर्तीवर बोंडारवाडी प्रकल्पास मंजूरी देण्यात यावी, अशी आमचा मागणी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समवेत उच्चस्तरीय बैठक आयोजीत करण्यात यावी.