जनावरांच्या चारा छावणीत भ्रष्टाचार प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | बिजवडी विकास सेवा सोसायटी संचलित जनावरांच्या चारा छावणीमधील भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांनी दिला आहे.

या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेले चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले अशी दोघांची नांवे आहेत. माण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झालेची शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी तक्रार दाखल दिली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर दहिवडी न्यायालयाने वरील दोनही आरोपींवरती दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करणेचा आदेश ६ मार्च २०२१ रोजी दिला होता. याकामी सरकारी वकील तरंगे व फिर्यादीचे वतीने वकील नितीन गोडसे यांनी काम पाहीले. या गुन्ह्याचा तपास दहिवडी पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. राजकुमार भुजबळ करीत आहेत.

Leave a Comment