Bottle Gourd Farming | दुधी भोपळ्याचे पीक देईल बंपर कमाई, अशाप्रकारे करा शेती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bottle Gourd Farming | जवळपास आता आपल्या देशात हिवाळा शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. त्यामुळे आता हिवाळी पिके संपून आता उन्हाळी पिकांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कोणत्या पिकांची लागवड करावी लागणार याचा विचार करत आहेत. परंतु तुम्ही या सिझनमध्ये दुधी भोपळ्याची लागवड करून खूप चांगले उत्पादन घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती आता आपण पाहूया.

उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. यावेळी शेतकरी पॉलिहाऊस मधून रोपे विकत आणतात आणि शेतात लावतात त्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा क्रेनमध्ये देखील हे लावतात.

शेती करताना या गोष्टी लक्षात ठेवा

दुधी भोपळ्याचे चांगले उत्पादन येण्यासाठी कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेला पुसा नवीन, पुसा संतोषी पुसा संदेश या जातींची लागवड करणे खूप गरजेचे असते. या पिकांची पेरणी किंवा लागवड नाले करून केली जाते शक्यतो नाल्यांची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे करा.

दुधी भोपळ्याच्या पिकासाठी योग्य हवामान | Bottle Gourd Farming

दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान लागते. या दुधी भोपळ्याची झाडे जास्त थंडी सहन करू शकत नाही. त्यामुळे या पिकाची लागवड जास्त करून मध्य भारतात केली जाते. या तापमानात तापमानात या झाडांची लागवड चांगल्या प्रकारे होते.

दुधी भोपळ्याची लागवड करताना शेतीसाठी योग्य जमिनीची निवड करणे, पेरणीची वेळ, बियाणे प्रक्रिया,खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, तन व्यवस्थापन, कीट व्यवस्थापन या गोष्टीची माहिती घेणे लक्षात खूप गरजेचे आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन दुधी भोपळ्याची लागवड केली, तर यातून तुम्हाला खूप चांगला नफा होऊ शकतो. कारण सहसा आपल्याकडे जास्त कुणी दुधी भोपळ्याची शेती करत नाही. आणि दुधी भोपळ्याला बाजारात देखील चांगला भाव असतो. आणि मागणी देखील असते. त्यामुळे तुम्ही जर दुधी भोपळ्याची लागवड केली, तरी तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.