Bottle Gourd Juice | दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने महिनाभरातच पोटाची चरबी होईल कमी, अशाप्रकारे करा सेवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bottle Gourd Juice | आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यामुळे त्यांचे वजन देखील वाढत आहे. आणि वजन वाढल्यावर सगळ्यात जास्त पोटावरील चरबी वाढते. या व्यस्त जीवनशैलीत ही चरबी कमी करणे. हा तुमच्यासाठी एक मोठा टास्कच असू शकतो. फॅट कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या युक्त्या करतात. परंतु तुम्ही अगदी घरच्या घरी काही उपाय करून हे पोटावरील फॅट्स कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगत आहोत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दुधी भोपळ्याचा ज्यूस (Bottle Gourd Juice) पिऊ शकता. यामध्ये कमीत कमी कॅलरीज असतात आणि हाय न्यूट्रिशन्स असतात. दुधी भोपळ्याच्या ज्यूसच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात.

एका रिपोर्टनुसार ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी दुधी भोपळ्याचा रस अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही नाष्ट्यामध्ये दुधी भोपळ्याचा ज्यूस पिऊ शकता. यामध्ये जीवनसत्वे, पोटॅशियम आणि लोह असते. जे आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक असते. तुम्ही जर सकाळी रिकाम्यापोटी हा ज्यूस पिला तर भूक कमी होण्यास मदत होते.

दुधीचा ज्यूस पिण्याचे फायदे | Bottle Gourd Juice

लो कॅलरी

कॅलरी कमी करण्यासाठी दुधीचा ज्यूस अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दुधी भोपळ्याच्या सेवनाने भूक देखील कमी लागते.

पोषक तत्वांनी समृद्ध | Bottle Gourd Juice

दुधीच्या रसामध्ये विटामिन्स मिनरल्स आणि इतर पोषक तत्वे असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील गरजा पूर्ण होण्यास मदत होते आणि आपण हेल्दी राहतो.

दुधी भोपळ्याचा ज्यूस कसा बनवायचा?

यासाठी तुम्ही एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घ्या. दुधीच्या साल काढून घ्या आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर हे तुकडे मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये घाला. आणि व्यवस्थित वाटून घ्या नंतर गाळून त्या दुधीच्या ज्यूस तयार आहे. तुम्ही पाण्यासोबत पिण्यासाठी एका भांड्यात घाला त्यानंतर थोडा वेळ तसेच ठेवा.

दुधीचा ज्यूस कसा घ्यायचा?

तुम्ही सकाळी रिकामी पोटी दुधीचा हा ज्यूस प्या. या मध्ये कोथिंबीर देखील घालू शकता. यात लिंबाचा रस मिसळल्याने देखील तुम्हाला फायदा होतो. तुम्ही जर नियमित त्याचे सेवन केले, तर वजन कमी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते.