हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढलं आहे. पेट्रोलच्या खर्चापासून सुटका करण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्यांकडूनही सुद्धा त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या मार्केट मध्ये उतरवल्या जात आहेत. इलेक्ट्रिक स्कुटर या दिसायला आकर्षक असल्याने तरुणाईला या गाड्यांचे चांगलेच वेड आहे. बाजारात ola, ather, bajaj, kinetic engrgy यांसारख्या अनेक आघाडीच्या कंपन्या अपडेटेड फीचर्ससह नवनवीन स्कुटर बाजारात आणत आहेत. परंतु किंमत जास्त असल्याने अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करू शकत नाहीत. मात्र आता चिंता करण्याचे कारण नाही. Bounce Infinity तात्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत तब्बल 24 हजार रुपयांनी स्वस्त केली आहे.
कंपनीने Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 21% ने म्हणजेच या स्कुटरची 24 हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटर आता तुम्ही अवघ्या 89,999 रुपयांना खरेदी करू शकता. यापूर्वी या स्कुटरची किंमत १ लाख १४ हजार रुपये होती. त्यामुळे ग्राहकांनो खरेदीची हीच ती वेळ आहे असं समजलं तरी हरकत नाही. परंतु तुम्हाला जर स्वस्तात स्कुटर खरेदी करण्याची असेल तर ३१ मार्चच्या आत खरेदी करावी लागले. कारण तोपर्यंतच कंपनीने ही ऑफर ठेवली आहे. तुम्ही Bounce Infinity च्या अधिकृत वेबसाईटवरून फक्त 499 रुपयांत या स्कुटरचे बुकिंग करू शकता.
Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1.9 kWh रिमूव्हल लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15 Amp सॉकेटमधून तुम्ही चार्ज करू शकता. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर 85 KM पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. यावेळी स्कूटरचे टॉप स्पीड 65 किमी प्रतितास इतकं राहील. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये लिक्विड-कूल्ड बॅटरी टेक्नॉलॉजीचा वापर केला असून ते तंत्रज्ञान फास्ट चार्जिंग, दमदार रेंज आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटी देते.