एका बाऊन्सरने बदललं क्रिकेटपटूचं नशीब, थेट नॅशनल टीममध्ये मिळाली एन्ट्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात अनेकवेळा एक बॉल खेळाडूला रातोरात सुपरस्टार बनवू शकतो. असंच काही गुलशन झासोबत झालं आहे. गुलशन झाची ओमानविरुद्धच्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ टीममध्ये निवड झाली आहे. ही ट्रायसीरिज ओमानमध्ये 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. गुलशनने आतापर्यंत फक्त 2 स्थानिक मॅच खेळल्या आहेत. यादरम्यान त्याने निवड समितीला प्रभावित केले. त्यामुळे त्याची राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. गुलशन झा हा स्थानिक क्रिकेटमध्ये नेपाळ पोलिसांच्या टीमकडून खेळतो.

https://twitter.com/poudelsagar__/status/1428993956218507274

आर्म्ड पोलीस फोर्स क्लबविरुद्ध त्याने एका मॅचमध्ये शानदार बॉलिंग केली. गुलशनच्या वेगाने विरोधी टीमच्या बॅट्समनना अडचणीत टाकलं. त्याने 7 ओव्हरमध्ये 36 रन देऊन त्याने 4 विकेट घेतल्या आणि आपल्या टीमला 8 विकेटने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. गुलशन झाच्या बाऊन्सरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

या स्पर्धेत गुलशनने काठमांडू मेयर्स इलेव्हनचा बॅट्समन खडक बोहोराला वेगवान बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर खडकच्या हेलमेटजवळून बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने गेला.ओमानमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ टीमचं नेतृत्व ज्ञानेंद्र मल्ला करणार आहे, तर दीपेंद्र सिंग उपकर्णधार असणार आहे. या ट्रायसीरिजच्या अगोदर नेपाळची टीम पपुआ न्यू गिनीविरुद्ध आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 च्या दोन वनडे खेळणार आहे.

Leave a Comment