अमृता भिसे (परभणी) – श्रावण पौर्णिमा दिवशी दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला जातो. रक्षाबंधन श्रावण महिन्यामध्ये पूर्ण चंद्र दिवस किंवा पौर्णिमा दिवस या दिवशी साजरा केला जातो. रक्षाबंधन हे नाव “संरक्षणाचे” बंधन आहे. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये रक्षाबंधन हा सण ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास आयुष्य व सुख लाभो, मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतः स असुरक्षित जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करेल. रक्षाबंधन आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. आपल्या संस्कृतीत बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पुजा आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते शिल, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुषार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने जुळून कित्येक मने येतात त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्या व्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. तसेच पौराणिक काळामध्ये महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवाची पत्नी द्रौपदीनेआपल्या साडीची किनार फाडून श्री कृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी द्रोपदीचे रक्षण केले. आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावा बहिणीचे परस्परांवरील प्रेम. रक्ताचे नाते असणारे भाऊ बहीण असोत किंवा मानलेले असो, पण या नात्या मागची भावना पवित्र व खरी आहे. त्या नात्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा आहे. हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्व जण आनंदाने साजरा करतात. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तिच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तिच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायम जपून ठेवत असते.
श्रावण पौर्णिमेला येणाऱ्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतिक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. भावा बहिणीचा स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी- पौर्णिमा’, भारतामध्ये ‘नारळी-पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनी नाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी आपल्यावर आहे अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. आता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ-बहिणीच्या अतुट प्रेमाचे, त्यांच्या नात्यांचे आणि बंधनांचे धागे अजूनही तितकेच घट्ट आहे. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजूनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्व आजही कायम आहे.