तापसीच्या ‘थप्पड’ने केली तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धांसू कमाई, कमावले इतके कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस झाले आहेत. आर्टिकल १५ नंतर, आणखी एका सामाजिक विषयाला स्पर्श करणाऱ्या अनुभव सिन्हा यांच्या घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांवर बनलेल्या थप्पड या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तापसीच्या ‘थप्पड’ बद्दल उत्साह खूपच वाढला होता. तापसी पन्नूच्या चित्रपटाची कहाणी खूप चांगली असल्याची पावती चित्रपट बघितलेल्या प्रेक्षकांकडून मिळत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळू लागले आहे. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या वेबसाइटनुसार रविवारी तापसीच्या चित्रपटाने ६.५० कोटींचा व्यवसाय केला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार, तापसी पन्नूच्या थप्पड चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०७ कोटी आणि दुसर्‍या दिवशी ५.०५ कोटींची कमाई केली. त्यानुसार चित्रपटाने तीन दिवसांत १५.०७ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान या चित्रपटाच्या कमितीविषयी कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

THAPPAD TRAILER: Taapsee Pannu | Anubhav Sinha |  Bhushan Kumar | Releasing 28 February 2020

पहिल्या दिवशी चित्रपटाला थंड प्रतिसाद असला तरी हळूहळू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. चित्रपट समीक्षकांना दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड’ खूप आवडला असल्याचे चित्रपट परीक्षणातून दिसत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा