व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! जिच्यावर जीवापाड प्रेम केले तिचीच केली निर्घृणपणे हत्या

जयपूर : वृत्तसंस्था – प्रियकरानं 5 वर्षे जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचीच निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं प्रेयसीला लॉजवर बोलवून तिच्यावर चाकूनं दहा वेळा वार करून तिची हत्या केली. महत्वाचे म्हणजे यानंतर आरोपीनं स्वत: देखील रेल्वेसमोर उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. हि घटना राजस्थानातील जोधपूर या ठिकाणची आहे. हत्या झालेल्या तरुणीचं नाव लक्षिता असं आहे.

मृत तरुणी पाली जिल्ह्यातील सोजत रोड येथील रहिवासी आहे. तर तिच्या प्रियकाराचं नाव हेमंत असून तो नागौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. मृत तरुणी जोधपूर याठिकाणी वसतीगृहात राहून कायद्याचं शिक्षण घेत होती. या दरम्यान मृत तरुणीची ओळख हेमंतशी झाली होती. यानंतर दोघांत प्रेम संबंध निर्माण झाले. या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान मागील आठवड्यात मृत तरुणी लक्षिता हिने अन्य एका तरुणासोबत साखरपुडा उरकला होता. यामुळे हेमंतला लक्षिताचा राग आला होता. सोमवारी रात्री दोघंही जोधपूरमधील जालोरी गेट येथील सिद्धीविनायक लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबले होते. पण यावेळी हेमंतच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

प्रेयसीनं दुसऱ्या तरुणासोबत साखरपुडा केल्याच्या रागातून आरोपी हेमंतनं लक्षितावर धारदार चाकूनं तब्बल दहा वार केले. यामध्येच लक्षिताचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी हेमंतनं मंडोर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हेमंतचा मृतदेह सापडला. मंडोर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हेमंतच्या खिशातील ओळखपत्रातून तो नागौरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. त्याच दिवशी सायंकाळी सिद्धिविनायक हॉटेलच्या खोलीत 25 वर्षीय लक्षिताचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या शरीरावर चाकूनं अनेक वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.