धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या किशनगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फिल्मी स्टाईलने एका तरुणीची हत्या केली आहे. शबीना नावाची तरूणी अचानक गायब झाली होती. यामुळे शबीनाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला असता या तरुणीचा मृतदेह ३१ मे रोजी अररिया बॉर्डरवर मिळाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. त्यासाठी त्यांनी एक एसआयटी टीमदेखील नेमली.

या टीमने पुराव्यांच्या आधारावर राहिल नावाच्या तरूणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने शबीनाची हत्या केल्याचे कबुल केले. त्याने सांगितले कि नव्या गर्लफ्रेन्डच्या नादात जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या केली आहे. राहिल हा पंजाबच्या लुधियानामध्ये काम करत होता आणि अनेक वर्षांपासून त्याचे शबीनासोबत प्रेमप्रकरण सुरू होते.

लॉकडाऊन दरम्यान जेव्हा राहिल आपल्या गावी आला तेव्हा तो नाजमीन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. याची खबर शबीनाला लागली. त्यामुळे शबीना राहिलमागे लग्नाचा तगादा लावू लागली. यामुळे राहिल खूप वैतागला होता. त्यामुळे शबीनापासून सुटका करण्यासाठी त्याने एका प्लॅन बनवला. या प्लॅनमध्ये त्याने नवीन गर्लफ्रेन्ड नाजमीनला सहभागी करून घेतले. राहिलने शबीनाला घरापासून दूर अररिया बॉर्डरवर भेटायला बोलवले. तो त्या ठिकाणी आपल्या नव्या गर्लफ्रेन्डसोबत शबीनाची वाट बघत थांबला होता. यानंतर राहिलने शबीनाला मक्याच्या शेतात नेवून तिची हत्या केली.

You might also like