पुणे प्रतिनिधी | पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समजणे विरोध केला आहे. कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातून ब्राह्मण पुजारी हद्दपार करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाज विरोध करणार अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी दिली आहे.
पुण्यात ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतु दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांची विटंबना करणाराला न्यायालयीन लढाई लढून न्याय नदेणाऱ्या पुण्या बाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून निवडणुकीला सामोरी जात असेल तर ब्राह्मण समजा त्या व्यक्तीला विरोध करणार अशी जळजळीत टीका आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
‘जातीचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारसुद्धा उभे करू,’ अशी आक्रमक भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्याआधीच चंद्रकांत पाटील अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.