Brain Stroke | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातील ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) हा अत्यंत गंभीर आणि झपाट्याने वाढत जाणारा आजार आहे. अनेक लोकांना आजकाल ब्रेन स्ट्रोक होताना दिसत आहे. ब्रेन स्ट्रोक ही अचानक उद्भवणारी परिस्थिती आहे. ज्यामध्ये काही वेळेस व्यक्तीचा मृत्यू होण्याचा देखील शक्यता असते. एका अहवालानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की, एक विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांना ब्रेन स्ट्रोक शक्यता जास्त असते. सहसा ज्या लोकांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यांना हा ब्रेन स्ट्रोक येतो. परंतु या संशोधनात काही धक्कादायक खुलासे देखील करण्यात आलेले आहे. आता संशोधनात काय म्हटले आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत
एक संशोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) गेल्या 48 वर्षाचा रेकॉर्ड चेक करण्यात आलेला आहे. यात असे आढळून आले आहे की, ज्या लोकांचा रक्तगट ए आहे, त्या लोकांना लहान वयातही ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका उद्भवतो. या चाचणीमध्ये जवळपास 6 लाख लोकांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यात असे निदर्शनास आलेले आहेत की, ए रक्तगट असलेल्या लोकांना इतर रक्तगटाच्या तुलनेत ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. ब्रेन स्ट्रोक हा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे ए रक्तगट असलेल्या लोकांनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
ए रक्तगट असलेल्या लोकांच्या अनुवंशिकतेमध्ये देखील ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. इतर लोकांच्या तुलनेत ए रक्तगट असणाऱ्या लोकांना ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता 16 पटीने जास्त असते. तसेच इतर रक्तगट असलेल्या लोकांना हा धोका 12% असतो. परंतु ओ रक्तगट असलेल्या लोकांना ब्रेन स्टोकचा धोका सगळ्यात कमी असल्याच्या या अभ्यासात आढळून आलेले आहे.
ब्रेन स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे | Brain Stroke
ब्रेन स्ट्रोक होण्याचे आधी तुम्हाला तीव्र डोकेदुखी जाणवते. तसेच चेहरा निस्तेज पडतो. डोळ्यांना काळपटपणा तसेच अंधुक दिसायला लागते. तुमचे ओठ फडफडतात. तसेच अन्न गिळण्यात देखील अडचण येते. जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे सुरुवातीच्या काळात जाणवत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचे संपर्क घेऊन उपचार चालू करा.
ब्रेन स्टोक टाळण्यासाठी कोणते उपाय करावे ?
ब्रेन स्ट्रोक हा अत्यंत अकाली येणारा आजार आहे. तो कोणत्याही वयात आणि कोणत्याही वेळेला येऊ शकतो. परंतु तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही दररोज व्यायाम करणे खूप गरजेचे असते. तसेच तुम्ही सकस आणि ताजा आहार घेतला पाहिजे. फास्ट फूड आणि जास्त तळलेले पदार्थ सहसा खाऊ नका. त्याचप्रमाणे तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान वर्ज केले पाहिजे. तुमच्या वजनात देखील नियंत्रण ठेवले पाहिजे. वजनात जर नियंत्रण असेल तर इतर अनेक आजार दूर होतात.