बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती, ३ महिन्यांनंतर प्रकार उघडकीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । एका अज्ञात नराधमाने केलेल्या बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती झाल्याची घटना जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या मतिमंदपणाचा फायदा घेत हा अज्ञात नराधम गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत मुलगी तिच्या आजोबांसोबत जामखेड तालुक्यातील त्यांच्या गावी इनामगाव मध्ये राहत होती. दरम्यान, या मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने तीन महीन्यांच्या कालावधीमध्ये या मतिमंद मुलीवर बलात्कार केला. यानंतर ही मतिमंद मुलगी अकरा आठवड्यांची गर्भवती राहीली. पीडित मुलगी मतिमंद असल्याने हा प्रकार लवकर कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र, पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पिडीत मुलीच्या वडिलांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून या अज्ञात व्यक्ती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे करत आहेत.

Leave a Comment