ब्रँडेड सिगारेटची चोरी करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून पर्दाफाश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ब्रँडेड सिगारेट चोरणाऱ्या (branded cigarette) आरोपीला सिगारेटसह (branded cigarette) अटक करण्यात आली आहे. दहिसर पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे. राजस्थानमधून ब्रँडेड सिगारेट (branded cigarette) चोरणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.

महेंद्रकुमार थानाराम मेघवाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला ब्रँडेड सिगारेटचे व्यसन आहे. त्यामुळे तो दिवसा ब्रँडेड सिगारेट विकणाऱ्या दुकानाची रेकी करायचा आणि रात्री त्या ठिकाणी चोरी करून पसार व्हायचा. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपन्यांच्या दीड लाख किमतीच्या ब्रँडेड सिगारेट (branded cigarette) जप्त केल्या आहेत.

कशाप्रकारे अडकला सापळ्यात?
दहिसर पश्चिम येथील पान दुकानाचे शटर उचकटून त्या ठिकाणी चोरी करत असताना चोरट्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये (branded cigarette) पोलिसांना दिसला त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पथके तयार करून आरोपीला जोगनी गली जिल्हा तखतकगड राजस्थान येथून अटक करण्यात आली. या आरोपीवर याअगोदरदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या