Wednesday, March 29, 2023

धाडसी चोरी : पुसेसावळीत चाैघांना मारहाण करून 5 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

- Advertisement -

खटाव | सातारा येथील पुसेसावळीत मंगळवारी मध्‍यरात्री दराेडेखाेरांच्‍या टाेळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे 12 तोळे सोने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम असा 5 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी संजय आप्पासो कदम यांनी पुसेसावळी पोलीसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, माने कुटुंबीय रात्रीचे जेवण करुन झोपले होते. रात्रीचे जेवण करुन झोपले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास माने यांचे जावई फिर्यादी संजय आप्पासो कदम यांची पत्नी सारीका यांना घरात कोणीतरी आल्याची चाहूल लागली. त्यांनी पती संजय यांना जागे केले. संजय यांनी दरोडेखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने कदम दाम्पत्यास मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. बेडरुममध्ये झोपलेल्या जयश्री माने यांच्याकडेही काही दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. त्यांनाही मारहाण केली.

- Advertisement -

या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या यावेळी झालेल्या गोंधळामुळे वरच्या मजल्यावर झोपलेले हणमंतराव माने खाली आले. दरोडेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. या चौघांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास करुन पोबारा केला. जाताना त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली त्यामुळे कुटुंबियांनी फोन करु शेजाऱ्यांची मदत घेतली. दरोडेखोर सुमारे 30 ते 35 वयोगटातील असू ते मराठी बोलत होते. याप्रकरण पुसेसावळी पोलिसांत गुन्हा नोंद झाली असून तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.