हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वेळा आपण समाजात अशी लोक पाहतो कि, ते आपल्या जीवावर उदार होऊन इतरांनाचा जीव वाचविणे हे सर्वात मोठं कर्तव्य समजतात. अशी अनेक बहादूर लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. अशीच बहादूरीची घटना अमेरिका मधील फ्लोरिडा येथे घडली. एक मुलगा किनाऱ्यावर खेळत असताना त्याच्या दिशेने येणारा शार्क पोलीस कर्मचारी असलेल्या पोएड्रियन कोसीकी यांना दिसला. त्यांनी ताबोडतोब जाऊन त्या मुलाला शार्क पासून वाचविले . त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. जगभरातून या व्हिडीओ चे कौतुक होत आहे तसेच त्यांच्या बहादूरीला हि सलाम करत आहेत.
हा व्हिडीओ कोकोआ बीच मधील पोलिसांच्या फेसबुक पेज वर पोस्ट करण्यात आला आहे. कोकोआ बीच अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलैंडो च्या जवळ आहे. पोलीस कर्मचारी असलेले एड्रियन कोसीकी आपल्या पत्नी सोबत वेळ घालवण्यासाठी समुद्र किनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने वेगात शार्क येताना दिसला तत्पूर्वी क्षणाचाही विलंब न करता सावधानतेचा पवित्रा घेत त्यांनी किनाऱ्यावर खेळात असलेल्या मुलाला वाचविले.
https://www.facebook.com/CocoaBeachPoliceFire/videos/602940080645147/
मुलगा एकदम चांगल्या अवस्थेत आहे. कोसीकी यांच्या बहादुरीची तारीफ सर्व स्तरातून होत आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओ २. ५ लाख लोकांनी पहिला आहे. फेसबुक वर टाकल्या गेलेल्या व्हिडीओत त्यांनी असं लिहले आहे कि, “काय माहित शार्क चे इरादे काय होते . पण हि गोष्ट त्या मुलाच्या चांगली लक्षात राहिली असेल आणि हि बहादूरीची गोष्ट मुलांना सांगायला तरी झाली”.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.