Brazil Plane Crash : 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; चित्तथरारक Video पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझील विमान अपघाताची (Brazil Plane Crash)धक्कादायक घटना घडली आहे. हवेत उंचावलेला विमान अवघ्या २ मिनिटात खाली कोसळलं. या विमानात एकूण ६२ प्रवासी होते, या सर्व जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्राझीलच्या नागरी सुरक्षा विभागानं अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमान कोसळल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं आहे. या विमान अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लूला डी सिल्वा यांनी दुःख व्यक्त करत मृत प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केलं आहे.

विमान अपघाताचा व्हिडिओ पहा – Brazil Plane Crash

हे विमान वोपास लिन्हास एरियासकडून चालवण्यात येत होतं. एअरलाइन वोपासनेही विमान कोसळल्याची पुष्टी केली आहे. Voipas Airlines द्वारे संचालित ATR 72-500 हे विमान दक्षिणी पराना राज्यातील कास्केवेल येथून साओ पाउलो येथील ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे उड्डाण करत असताना विन्हेडो शहरात अपघात झाला. या विमानात 62 लोक होते. यामध्ये 58 प्रवासी आणि 4 क्रू मेम्बर्सचा समावेश होता. हे सर्वजण या विमान अपघातात मृत्युमुखी पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच ज्याठिकाणी हे विमान कोसळलं त्या घराचेही नुकसान झालं. विमान जमिनीपासून १७ हजार फूट उंचीवर होतं. दोन मिनिटांत ते ४ हजार फूट खाली आलं. त्यानंतर त्याचा जीपीएस सिग्नल नकाशावर दिसायचा बंद झाला.

विमान अपघाताचा (Brazil Plane Crash) एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही त्यात बघू शकता कि हवेत झेप घेतलेलं विमान अवघ्या २ मिनिटातच एखाद्या कागदाच्या पानासारखं हवेत फिरताना दिसत आहे. विमान जमिनीवर कोसळताच आसमतांत काळा धूर पसरताना दिसतो. आणि जमिनीवर कोसळताच त्याला आग लागल्याचे दिसत आहे. या अपघातानंतर ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी दुःख व्यक्त केलं. अपघातातील मृतांसाठी एक मिनिट मौन पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.