कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ लाख २६ हजार कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

कोरोना साथीच्या आजाराचे सर्वात मोठे केंद्र अमेरिका आहे, जिथे ९७ हजाराहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे . आता ब्राझील देखील याच दिशेने वाटचाल करत आहे. येथे, गेल्या काही आठवड्यापासून दररोज सुमारे १५ हजार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह होत आहेत तसेच दररोज सुमारे एक हजार मृत्यू देखील होत आहेत. गेल्या २४ तासांत १९९६९ नवीन संसर्गित रुग्ण आढळले आहेत आणि ९६६ लोक मरण पावले आहेत. तत्पूर्वी १७५६४ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि १,१८८ लोक हे मरण पावलेले आहेत. तज्ञ म्हणतात की येथे वास्तविक आकडेवारी १५ पट जास्त असू शकते.

ब्राझीलमध्ये संक्रमित ३.३० लाख पैकी १ लाख ३५ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. तेथे १ लाख ७४ हजार ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत, म्हणजेच बर्‍याच लोकांना सध्या कोरोनाची लागण झालेली आहे तसेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. सक्रिय प्रकरणाकच्छा बाबत ब्राझीलचे जगातील तिसरे स्थान आहे तर रशिया दुसर्‍या क्रमांकावर आहे. रशियामध्ये रिकव्हरीचा दरही कमीच आहे, यामुळे ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या ही २ लाख २३ हजार आहे.

ब्राझील नंतर सर्वात ऍक्टिव्ह प्रकरणे फ्रान्स आणि भारतात आहेत. भारतात रिकव्हरीचा दर ४१ टक्के आहे. येथे संक्रमित १ लाख २५ हजारांपैकी ५१ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. तेथे ७३ हजार ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment