Breakfast Skipping Side Effects | सकाळी नाश्ता न करणे आरोग्यासाठी धोकादायक; होऊ शकतात हे गंभीर आजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Breakfast Skipping Side Effects | आजकाल धावपळीच्या जगामध्ये माणूस खाण्यापिण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. सकाळी कामाला जाण्याची घाई असते. त्यात सकाळी घरात सगळं आवरून जाताना अनेक वेळा लोक नाष्टाही करत नाही. आणि तसेच ऑफिसला जाताना आणि थेट दुपारी जेवतात. परंतु याचा तुमच्या आरोग्यावर मोठ्या परिणाम होतो. आणि तुम्हाला अनेक आजारांचा धोका वाढतो. कारण तुम्ही रात्री जेवलेले असता. त्यामुळे सकाळी उठून जेवणे खूप गरजेचे असते. अन्यथा तुमच्या शरीरातील ऍसिडचे प्रमाण वाढते. सुरुवातीला तुमच्या शरीराला खूप हळूहळू प्रॉब्लेम दिसतात. परंतु जर तुम्ही नाष्टा केला तर तुमच्या शरीराला ऊर्जा देखील मिळते आणि फिटनेस चांगला राहतो. आता जर तुम्ही सकाळी नाष्टा केला नाही तर तुमच्या आरोग्याला कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मधुमेह | Breakfast Skipping Side Effects

सकाळी नाश्ता न केल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. न्याहारी न केल्याने चक्कर येणे आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

प्रतिकारशक्ती कमकुवत होते

सकाळी नाश्ता न केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे शरीरावर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. पोट जास्त वेळ उपाशी ठेवल्याने पेशींचे नुकसान होते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

लठ्ठपणा वाढतो

नाश्ता वगळल्याने लठ्ठपणा वेगाने वाढू शकतो. जे लोक न्याहारी सोडून दुपारचे जेवण थेट खातात, त्यांचे वजन झपाट्याने वाढते, यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते. लठ्ठपणा हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

चयापचय मंद होते

नाश्ता न केल्याने चयापचय मंदावतो आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. मंद चयापचयमुळे, शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते आणि एखाद्याला अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वजनही वाढू शकते.

मायग्रेन

नाश्ता न केल्यामुळे अनेकांना मायग्रेन होऊ शकतो. जास्त वेळ उपाशी राहिल्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. यामुळे मायग्रेन देखील होऊ शकतो.