Breaking | महादेव जानकर ‘या’ कारणामुळे पडणार महायुतीतून बाहेर?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | दौंड व जिंतूर मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र या मतदार संघातील उमेदवारांना भाजपचे एबी फोर्म दिले गेल्याने नाराज असलेले महादेव जानकर यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारर्‍यांची तातडीची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

मित्रपक्षांच्या जागांवर आपले उमेदवार उभे करुन भाजपने विश्वासघात केल्याची भावना जानकर यांची झाली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात मित्रपक्ष असताना देखील भाजपने राहुल कुल यांना एबी फोर्म दिल्याने जानकर दुखावले असल्याचे बोलले जातेय.

महादेव जानकर उद्या सोमवारी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडला तर याचा भाजपला मोठा धक्का असणार आहे. जानकर आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या-